Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रभादेवी पुलासाठी रेल्वेचे आणखी 39 ब्लॉक्स घेणार;  लोकल, मेल-एक्स्प्रेसची वाहतूक कोलमडणार, नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे 'महारेल'चे टार्गेट

प्रभादेवी पुलासाठी रेल्वेचे आणखी 39 ब्लॉक्स घेणार; लोकल, मेल-एक्स्प्रेसची वाहतूक कोलमडणार, नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे 'महारेल'चे टार्गेट

सामना 4 days ago

लालबाग-परळ परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या प्रभादेवी पुलाच्या उभारणीला गती देण्यात येणार आहे. या पुलाचे काम डेडलाइनपूर्वी म्हणजे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट 'महारेल'ने ठेवले आहे.

यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर आणखी 39 ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने 'महारेल'ने गर्डर्स लाँचिंग नियोजनासह सविस्तर ब्लॉक शेड्युल दोन्ही रेल्वे प्रशासनांकडे पाठवले आहे. ब्लॉक काळात अनेक लोकल ट्रेन आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीचे वेळापत्रक कोलडण्याची शक्यता आहे.

प्रभादेवी रेल्वे स्थानकातील 112 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाच्या जागी वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पांतर्गत डबलडेकर 'रोड ओव्हर ब्रीज' उभारण्यात येत आहे. जुन्या पुलाचे पाडकाम पूर्ण केल्यानंतर सध्या नव्या पुलाच्या उभारणीसाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याची कार्यवाही सुरू आहे. हा पूल पश्चिम आणि मध्य रेल्वे या दोन्ही वर्दळीच्या रेल्वे मार्गांवरून जात असल्याने रेल्वेच्या ब्लॉक्सची आवश्यकता आहे. पूल उभारणीसाठी महाकाय गर्डर्स बसवण्यात येणार आहेत. हे आव्हानात्मक काम ब्लॉक्स घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.

पुलासाठी आवश्यक चार स्टील स्पॅन्स मुंबईत दाखल

नवीन पुलामध्ये 92.5 मीटर लांबीचे दोन भाग व 34.5 मीटर लांबीचे दोन स्पॅन्स असे एकूण चार स्टील स्पॅन्स असतील. हे चारही स्टील स्पॅन्स 15 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाले आहेत. ते चेंबूर आणि पनवेल येथील संबंधित यार्डमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ब्लॉक्सचे शेड्युल

नवीन पुलाच्या उभारणीसाठी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मार्गांवर एकूण 39 रेल्वे ब्लॉक्सची आवश्यकता आहे.

25 दिवसांच्या कालावधीत सर्व ब्लॉक्स घेण्यात येतील.

39 पैकी 32 ब्लॉक्स पुलाचे स्पॅन्स बसवण्यासाठी आवश्यक आहेत, तर उर्वरित ब्लॉक्सचा उपयोग पूर्वतयारीच्या कामांसाठी केला जाणार आहे.

सर्व ब्लॉक्स प्रत्येकी 2 तास 30 मिनिटांचे 'कॉरिडॉर ब्लॉक्स' असतील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana