Dailyhunt
प्रल्हादराय डालमिया कॉलेजचे यश

प्रल्हादराय डालमिया कॉलेजचे यश

सामना 2 weeks ago

प्रल्हादराय डालमिया लायन्स कॉलेजला मुंबईतील 297 वाणिज्य महाविद्यालयांपैकी 'स्कूल क्वालिटी अ‍ॅण्ड अ‍ॅश्युरन्स फ्रेमवर्क' अंतर्गत ए प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.

मुंबईतील केवळ नऊ वाणिज्य महाविद्यालयांना या मूल्यांकन पद्धतीअंतर्गत हे यश मिळाले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच शैक्षणिक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी ट्रस्टी व कॉलेज कर्णधार परिषदेचे महामंत्री लायन कन्हैयालाल सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय व्यवस्थापनातर्फे मालाड पश्चिम येथील महाविद्यालय परिसरात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. प्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. गंजेवार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या किरण मिश्रा, शरद रुईया, अशोक बैरागरा, कमल रुईया यांची यावेळी उपस्थिती होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana