Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रारूप मतदार यादीतील संशयास्पद मतदारांची यादी प्रसिद्ध करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

प्रारूप मतदार यादीतील संशयास्पद मतदारांची यादी प्रसिद्ध करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

सामना 1 week ago

विशेष मतदार यादी पुनर्निरिक्षण (एसआयआर) मोहिमेनंतर राज्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमधील संशयास्पद मतदारांची यादीही स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.

चोक्कलिंगम यांच्याकडे केली.

एसआयआर मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये संशयास्पद व अनुपस्थित मतदारांची नावे सुद्धा आहेत; परंतु कोणत्याही प्रकारची खूण त्या नावांवर मारलेली नाही. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल. याच मतदारांना नोटीस देऊन सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. ज्या मतदारांना नोटीस देण्यात येणार आहे, अशा मतदारांची बूथनिहाय यादी तातडीने प्रसिद्ध करावी व ती राजकीय पक्षांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिले आहे.

संशयास्पद मतदारांनाही स्थलांतरित दाखवण्याची भीती

महाराष्ट्रात जसे 1 कोटी 52 लाख मतदार सापडले नाहीत अथवा कायमचे स्थलांतरित दाखविण्यात आले, तशीच पद्धत बीएलओ वापरतील आणि अजून कोट्यवधी मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात येईल, अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे. अजूनही विधानसभा मतदारसंघनिहाय नोटीस व सुनावणीची कार्यपद्धतीची माहिती बीएलओंना देण्यात आलेली नाही, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana