Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रतीक्षा संपली ! म्हाडाच्या २,६४० घरांसाठी उद्या सोडत !!

प्रतीक्षा संपली ! म्हाडाच्या २,६४० घरांसाठी उद्या सोडत !!

सामना 2 weeks ago

म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० घरांच्या विक्रीसाठीची संगणकीय सोडत गुरुवारी दुपारी १२ वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

त्यामुळे सुमारे ७५ हजार अर्जदारांची चार महिन्यांपासूनची प्रतीक्षा अखेर संपणार असून त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

म्हाडाने ३० मार्च रोजी कन्नमवार नगर-विक्रोळी, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, पवई, माझगाव, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉ प हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांसाठी २,६४० घरांसाठी सोडत जाहीर केली होती. अर्जदारांच्या अल्प प्रतिसादामुळे सोडतीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली

या लॉटरीतील सर्वात कमी किमतीचे घर पीएमजीपी मानखुर्द येथे असून त्याची किंमत २९ लाख ३७ हजार रुपये आहे. चार घरांसाठी सोडतीत समावेश असून या घरांसाठी केवळ ४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वात महागडे घर ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये असून त्याची किंमत ६ कोटी ८२ लाख रूपये आहे. येथील दोन घरांसाठी २१ अर्ज आले आहेत.

सर्वाधिक अर्ज पंतप्रधान आवास योजनेतील गोरेगावमधील घरांसाठी आले आहेत. येथील १३ घरांसाठी तब्बल १७,७५५ अर्ज प्राप्त झाले आहेत म्हणजे एका घरासाठी १३६५ अर्जदारांमध्ये चुरस असणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana