Sunday, 08 Sep, 2.14 am सामना

ठळक बातम्या
प्रेम विवाह केला म्हणून मुलीला घरी बोलावून गळा चिरला

  • tags

हरयाणातील गोहाना येथे सैराट चित्रपटातील कथेला साजेशी घटना घडली आहे. सोनीपत जिल्ह्यातील खंदराई येथे प्रेमविवाह केलेल्या मुलीला घरी बोलावून घरातल्यांनी तिची गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीने घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले होते. त्यामुळे सगळे तिच्यावर नाराज होते. ऋतु (21) असे मृत तरुणीचे नाव असून अर्जुन (23) असे तिच्या पतीचे नाव आहे.

ऋतु व अर्जुन यांच्यात प्रेमसंबंध होते. ते एकाच जातीचेही होते. यामुळे घरचे या लग्नास विरोध करणार नाहीत असे त्यांना वाटत होते. पण ऋतुच्या घरच्यांनी मात्र या लग्नास विरोध केला. त्यामुळे जुलै महिन्यात ऋतु व अर्जुन यांनी घरातून पळून लग्न केले. यामुळे समाजात नाचक्की झाल्याचे ऋतुच्या घरच्यांचे म्हणणे होते. हाच राग मनात ठेवून त्यांनी झाले गेले विसरून घरी येण्यास ऋतुला सांगितले. घरच्यांनी आपल्याला माफ केले असे समजून शनिवारी ऋतु आणि अर्जुन गोहाना येथे आले. पण दोघांनी एकत्र घरी न जाण्याचे ठरवले. यामुळे अर्जुन एका रुग्णालयाजवळ थांबला. तर ऋतु एकटीच भावाबरोबर मोटारबाईकवरून घरी गेली. आई वडीलांना भेटण्यास मिळणार म्हणून ती आनंदात होती. पण घरी आल्यावर तिला वेगळंच चित्र दिसलं.

कोणीही तिच स्वागत केलं नाही की कोणी तिची गळाभेटही घेतली नाही. उलट सगळे तिच्यावर तुटून पडले. याचदरम्यान, भावाने कुऱ्हाडीने वार करत तिचा गळा चिरला. ऋतु रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर सगळ्यांनी तिथून पळ काढला. यामुळे शेजाऱ्यांना संशय आला व त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

आपली प्रतिक्रिया द्या
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top