Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियकरासाठी पतीला सोडून गेली, दोन वर्षानंतर ट्रॉली बॅगमध्ये मृतावस्थेत आढळली

प्रियकरासाठी पतीला सोडून गेली, दोन वर्षानंतर ट्रॉली बॅगमध्ये मृतावस्थेत आढळली

सामना 1 week ago

प्रियकराशी लग्न करण्यासाठी पतीला सोडून गेलेल्या विवाहितेचा दोन वर्षांनंतर सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला. कुटुंब आणि समाजाची पर्वा न करता महिला प्रियकरासोबत नवीन आयुष्याची सुरवात करण्यासाठी गेली.

मात्र या प्रेमाचा इतका भयंकर अंत होईल याची तिने कल्पनादेखील केली नसेल. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारच्या नवादा जिल्ह्यातील छोटी कुमारी या महिलेचे एका तरुणासोबत विवाहबाह्य प्रेम जुळले. प्रियकराशी लग्न करण्यासाठी छोटी कुमारीने दोन वर्षांपूर्वी पतीचे घर सोडले. कुटुंबाने तिचा खूप शोध घेतला, पण तिचा काहीच थांगपत्ता लागलना नाही. अखेर कुटुबीयांनी रोह पोलीस ठाण्यात अपहरण आणि बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

यानंतर दोन वर्षांनंतर दमणमध्ये एका ट्रॉली बॅगमध्ये तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी महिलेची ओळख पटवत अधिक तपास केला असता तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. छोटी कुमारीची हत्या कोणत्या कारणातून याबाबत अद्याप उलगडा झाला नाही. दमण पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीच्या अटकेनंतर आणि शवविच्छेदन अहवालानंतरच छोटी कुमारीच्या हत्येमागचे कारण स्पष्ट होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana