Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रद्द करा, एनएसयूआयची मागणी

पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रद्द करा, एनएसयूआयची मागणी

सामना 1 week ago

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे प्रशासनाने मान्य केल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने राबवावी. तसेच या प्रक्रियेतून झालेल्या नियुक्त्याही तातडीने रद्द कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे महासचिव अॅड.

कृष्णा साठे यांनी केली आहे.

भरती प्रक्रियेतील संशयास्पद बाबींबाबत एनएसयूआयने आंदोलने केली. आयुक्तांची भेट घेऊनही विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप साठे यांनी केला.

अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे मान्य करत तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. असे असतानाही उमेदवारांना नियुक्त्या देण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल साठे यांनी उपस्थित केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana