Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pune News - खडकवासला धरणाचा विसर्ग वाढवून 43,571 क्युसेकवर; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pune News - खडकवासला धरणाचा विसर्ग वाढवून 43,571 क्युसेकवर; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सामना 1 week ago

डकवासला धरण आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी ठीक दुपारी 3 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणारा विसर्ग 35,574 क्युसेकवरून वाढवून थेट 43,571 क्युसेक इतका करण्यात येणार आहे.

त्यामुळे मुठा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची दाट शक्यता आहे, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या वाढीव विसर्गामुळे मुठा नदीची पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कृपया नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीपात्रात काही तत्सम साहित्य, पंप किंवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना प्रशासकीय स्तरावर तातडीने योग्य त्या सूचना देण्यात याव्यात आणि योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या सर्व नागरिकांनी या आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी व पूर्ण दक्षता घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana