काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी नाशिकमध्ये येत आहेत. राज्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या शिबिरात ते मार्गदर्शन करणार आहेत. नाशिकच्या गंगापूर धरणालगत एमटीडीसीच्या रिसॉर्ट येथे 24 ऑगस्टपासून राज्यातील काँग्रेसच्या 72 जिल्हाध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण शिबीर सुरू आहे.
बुधवारी, 2 सप्टेंबरला या शिबिराचा समारोप होणार आहे.त्यावेळी राहुल गांधी हे शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. दौऱ्यात सकाळी अकरा वाजता आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे.

