Saturday, 12 Oct, 10.40 am सामना

मुंबई
राज्याच्या तिजोरीचा विचार करून वचननामा प्रसिद्ध- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019साठीचा शिवसेनेचा वचननामा शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा विचार करून हा वचननामा प्रसिद्ध करत असल्याचं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच हा वचननामा प्रसिद्ध करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

वाचा या प्रकाशन सोहळ्याचे काही ठळक मुद्दे

 • अत्यंत प्रामाणिकपणाने आम्ही हा वचननामा महाराष्ट्राच्या जनतेच्या चरणी अर्पण करत आहोत.
 • मात्र, या अन्नाचा दर्जा उत्तम राहील, याकडे लक्ष पुरवणार
 • या कॅन्टिनमध्ये 10 रुपये ते 100 रुपयांपर्यंत अन्न मिळू शकेल, जेणेकरून सर्वांना अन्न मिळू शकेल
 • प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बचत गटांच्या साहाय्याने कॅन्टिन उभारणार
 • ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेसची सोय
 • तीर्थक्षेत्रांच्या प्रवासासाठी समन्वय केंद्रांची स्थापना करणार
 • खतांचे दर पाच वर्ष स्थिर राहतील अशी व्यवस्था करणार
 • पिकविमा योजनेत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा मिळण्याची सोय करणार
 • शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
 • गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार रुपये देणार
 • ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी वचननाम्यात विशेष तरतुदी
 • आम्ही जाहीरनामा करत नाही, वचननामा करतो
 • हा वचननामा खूप संशोधनानंतर तयार करण्यात आला आहे.- आदित्य ठाकरे
 • आमच्याकडून कोणताही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही, असं वचन देतो- उद्धव ठाकरे
 • सर्व पक्षांनी आरेबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, शिवसेना चर्चा करायला तयार- उद्धव ठाकरे
 • वचननाम्यात सर्व घटकांचा विचार केला गेला आहे.
 • मुंबईसाठीच्या वचननाम्यात आरेचा उल्लेख जंगल असा करणार- आदित्य ठाकरे
 • 10 रुपयांत गोरगरीबांना अन्न
 • राज्याच्या तिजोरीचा विचार करून वचननामा प्रसिद्ध
 • एक रुपयात होणार आरोग्य चाचणी
 • घरगुती वापराच्या विजेवर 30 टक्के पर्यंत दर कमी करणार
 • वचननाम्याच्या प्रक्रियेतही महिलांचा मुख्य सहभाग
 • शिवसेनेचा जाहीरनामा नाही तर वचननामा
 • वचननाम्यातील प्रक्रियेबाबत आदित्य ठाकरे यांने भाषण
 • वचननाम्यातील काही मुद्दे दसरा मेळाव्याला बोललो आहे- उद्धव ठाकरे
 • वचननाम्याचा प्रकाशन सोहळा सुरू
 • हे प्रकाशन वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानावर करण्यात येणार आहे.
 • शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना वचननामा 2019 चे प्रकाशन
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top