Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचा दबदबा

राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंचा दबदबा

सामना 1 month ago

पुण्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग निवड स्पर्धेत मुंबई शहर किक बॉक्सिंग संघटनेच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत 10 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्यांसह 32 पदकांची कमाई केली.

या स्पर्धेत पॉइंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, किक लाईट, लो किक, फुल कॉन्टॅक्ट आणि क्रिएटिव्ह फॉर्म अशा विविध प्रकारांमध्ये मुंबई शहराच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय रेफरी विघ्नेश मुरकर आणि उमेश मुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या जोरदार कामगिरीमुळे मुंबई शहरातील खेळाडू आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सज्ज झाले आहेत. विजेते सबज्युनिअर खेळाडू 17 ते 21 जून 2026 दरम्यान इंदूर पब्लिक स्कूल, मध्य प्रदेश येथे होणार्या सबज्युनिअर राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच ज्युनिअर खेळाडू 30 मे ते 3 जून 2026 दरम्यान भुवनेश्वर, ओडिशा येथे रंगणाऱया राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबई शहराचे प्रतिनिधित्व करतील.

राज्यनिवडस्पर्धेतीलपदकविजेते

सुवर्णपदक – माहीपायेलकर, जिदानखान, सावीरपलाये, सय्यदअहमद, विघ्नेशपरब, कुणालसिंह, ध्रुवपालव, प्रज्ञेशपटवर्धन, श्रेयांकमौर्य, आणिसंदीपपाटील.

रौप्यपदक – शामिकाशिंदे, तेजससकपाळ, प्रज्ञेशपटवर्धन, श्रेयांकमौर्य, माहीपायेलकर, सिद्धेशआगवणे, शिवमभनगेआणिसाईसाळेकर.

कांस्यपदक – मानसीपाटवा, जिदानखान, सय्यदअहमद, तेजससकपाळ, रियांशपटवर्धन, त्विषासाळते, सिद्धेशआगवणे, शिधतगुप्ता, श्रियांशगायकवाड, आराध्यसिंहआणिरुद्रराणे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana