Sunday, 09 Aug, 8.16 am सामना

ठळक बातम्या
राज्यात 12 हजार 822 नवे रुग्ण, 11 हजार कोरोनामुक्त

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने आज नवा उच्चांक गाठला. एकाच दिवसात 12 हजार 822 कोरोना रुग्ण आढळले आहेत. असे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 67.26 टक्क्यांवर पोहोचले असून 11 हजार 81 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 5 लाख 3 हजार 84 झाला असला तरी त्यातील 3 लाख 38 हजार 362 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 47 हजार 48 रुग्णांकर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात दिवसभरात कोरोनामुळे झालेल्या 275 मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई मनपा-58, ठाणे- 6, ठाणे मनपा-15,नवी मुंबई मनपा-6, कल्याण डोंबिवली मनपा-12, मीरा भाईंदर मनपा-9, पालघर-5, वसई-विरार मनपा-9, रायगड-13, पनवेल मनपा-4, नाशिक-5, नाशिक मनपा-3, नगर-2, धुळे-1, धुळे मनपा-7, जळगाव-2, पुणे-8, पुणे मनपा-39, पिंपरी चिंचवड मनपा-20, सोलापूर-6, सोलापूर मनपा-1, सातारा-1, कोल्हापूर-8, कोल्हापूर मनपा-1, सांगली-4, सांगली मिरज कुपवाड मनपा-4, रत्नागिरी-4, संभाजीनगर मनपा-2, जालना-6, लातूर-1, धाराशिव-1, बीड-3, अकोला मनपा-1, यकतमाळ-2, नागपूर-1, नागपूर मनपा 5 जणांचा समाकेश आहे.

मुंबईत आज 1,304 नवे रुग्ण, 58 जणांचा मृत्यू

मुंबईत आज कोरोनाचे 1,304 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 58 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,454 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 95 हजार 354 वर पोहोचली आहे. मुंबईत 58 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 748 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्क्यांवर आले आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन आता 19 हजार 932 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 5 लाख 92 हजार 230 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 22 हजार 331 कर पोहोचली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top