कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक घाबरून शहर सोडू लागले आहेत. अनेकजण शासनाचा पास मिळवून गावाकडे धाव घेऊ लागले आहेत. नेमका याचाच फायदा उचलत दोघे भामटे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या नावाने हुबेहूब बनावट ई पास बनवून त्याचा गैरफायदा घेत होते. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने त्या दोघांचा धंदा उद्धवस्त केला.
कल्याण, उल्हासनगर येथील काही लोक आर्थिक फायद्यासाठी राज्यात कुठेही प्रवास करण्यासाठी नागरिकांना ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या नावाने अनधिकृत ई पास मिळवून देत असल्याची माहिती युनिट 1 ला मिळाली.

