राज्यातील विविध भागांमध्ये शुक्रवारी मॉन्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात काल वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांची उन्हाच्या चटक्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने कमाल तापमानात घसरण होऊ लागल्याने उन्हाच्या चटक्यापासून सुटका झाली होती. त्यातच काल शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, ग्रामीण भागात झालेल्या जोरदार पावसाने काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले. आज पुणे शहरात ३४.७ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्यात २४ ते २९ मे या कालावधीत दुपारनंतर हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम यंदा उष्णतेच्या लाटेमध्ये विदर्भ अक्षरशः होरपळून निघाला आहे. विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाच्या पाऱ्याने ४७ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. आज राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे ४७.१ अंश सेल्सिअस इतकी झाली. दरम्यान, विदर्भात २४ ते २९ मे या कालावधीत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, यलो अलर्ट दिला आहे.
मॉन्सून सक्रिय होण्याची प्रक्रिया वेगाने
सध्या मॉन्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मॉन्सूनने आज दक्षिण-पश्चिम अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तसेच बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि अंदमान समुद्राच्या बहुतांश क्षेत्रामध्ये आगेकूच केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मॉन्सून आणखी पुढे येण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात मॉन्सू केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रास मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवन तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामा खात्याने वर्तवली आहे. तर, उद्या (दि. २४ कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध् तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्य कडकडाटासह पावसाची शक्यता असून हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.

