Friday, 11 Jun, 4.28 pm सामना

ठळक
रत्नागिरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग, उद्दीष्ट पुर्ण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक कोवॅक्सीन आणि कोविशील्ड लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. आतापर्यंत तालुक्यात 5 हजार 569 जणांनी कोवॅक्सीनचा तर 22 हजार 679 जणांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. कोवॅक्सीनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 3579 तर कोविशील्ड लसीचा डोस घेणाऱ्यांची संख्या 1305 इतकी आहे.

खेड तालुक्यात तळे, कोरेगाव, फुरुस, आंबवली, वावे, लोटे, शिव, तिसंगी, हे सात प्राथमिक आरोग्य केंद्र तर खेड नगरपालिका, आवाशी, कळंबी, जामगे. घरडा, पोसरे, सात्विनगाव लवेल आणि खेड शहरातील सहजिवन विद्यालय या केंद्रावर लसीकरण सुरु आहे. सुरवातीला लसीकरणाला तितकासा प्रतिसाद नव्हता मात्र आता लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.

खेड नगरपालिका रुग्णालय लसीकरण केंद्रात आतापर्यंत 443 जणांनी कोवॅक्सीन लसीचा पहिला तर 879 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 4191 जणांनी कोविशिल्ड लसीचा पहिला तर 66 जण दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरु असल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top