Dailyhunt
रिलायन्सच्या 'ब्युटी आणि पर्सनल केअर'मध्ये आता प्रियांकाचा 'अ‍ॅनोमली' ब्रँड

रिलायन्सच्या 'ब्युटी आणि पर्सनल केअर'मध्ये आता प्रियांकाचा 'अ‍ॅनोमली' ब्रँड

सामना 2 weeks ago

रिलायन्स रिटेलच्या ब्युटी पोर्टफोलिओ आता आणखी वेगाने विस्तार होताना पाहायला मिळणार आहे. कारण रिलायन्स रिटेल लिमिटेडने (RRL) अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनसचा हेअरकेअर ब्रँड 'ॲनामली' (त्यांच्या ट्रेडमार्क, ब्रँड मालमत्ता आणि डिजिटल हक्कांसह) खरेदी करत असल्याची घोषणा केली आहे.

उद्योग क्षेत्रातील ही एक मोठी घडामोड मानली जाते. प्रियांका चोप्रा या ब्रँडसोबत यापुढेही जोडलेली असेल. रिलायन्स तिच्यासोबत मिळून हा ब्रँड हिंदुस्थानात आणि जगभरात मोठ्या स्तरावर नेण्यासाठी काम करेल.

प्रियांका चोप्राने २०२१ मध्ये ‘ॲनामली’ हा एक क्लीन, व्हेगन आणि अत्यंत कार्यक्षम असा हेअरकेअर ब्रँड बाजारात आणला. आजही तो वाजवी किमतीत उपलब्ध आहे. हा ब्रँड प्रमुख जागतिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली एक ओळख निर्माण केली आहे. ‘हिंदुस्थानात या ब्रँडचा विस्तार करण्यात येईल. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा विस्तार सुरूच राहिल’, असं रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana