Saturday, 28 Nov, 5.19 am सामना

ठळक
रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा फैसला 11 डिसेंबरला, विराट कोहलीच्या नाराजीनंतर बीसीसीआयकडून अपडेट

रोहित शर्माच्या फिटनेसबाबत स्पष्टतेचा अभाव दिसून आला अशा शब्दांत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन-डे आधीच्या पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केल्यानंतर बीसीसीआय खडाडून जागी झाली. रोहित शर्मा व इशांत शर्मा या दोघांच्या दुखापतीबाबत त्यांच्याकडून गुरुवारी अपडेट देण्यात आले. इशांत शर्मा ऑस्ट्रेलियन दौऱयाला मुकणार असून रोहित शर्माचा फैसला 11 डिसेंबरला घेण्यात येणार आहे अशी माहिती बीसीसीआयकडून यावेळी देण्यात आली.

वडिलांच्या आजारपणामुळे मुंबईत आला

रोहित शर्मा आयपीएल आटपल्यानंतर टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला नाही. त्याचे वडील आजारी होते. त्यामुळे तो थेट मुंबईत आला. आता त्याचे वडील बरे होत आहेत. रोहित शर्मा आता राष्ट्रीय क्रिकेट अॅपॅडमीत आहे. तो दुखापतीमधून बरा होत आहे. येत्या 11 डिसेंबरला रोहित शर्माची फिटनेस चाचणी घेण्यात येणार आहे तसेच त्याच्या दुखापतीवरही लक्ष देण्यात येणार आहे. यामध्ये तो पास झाल्यानंतरच त्याचे ऑस्ट्रेलियन दौऱयातील कसोटी मालिकेसाठी तिकीट पक्के होईल.

- दोन कसोटीत खेळण्याची शक्यता

रोहित शर्माची कसोटी मालिकेत निवड झाल्यानंतरही त्याला फक्त दोनच कसोटीत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यात येण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलियात 14 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी हा अनिवार्य आहे. त्यानंतरच त्याला प्रत्यक्षात मैदानावर लढतीसाठी उतरता येणार आहे. तसेच विलगीकरणात त्याला सराव करता यावा यासाठीही बीसीसीआयकडून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती करण्यात येणार आहे.

- वेगवान गोलंदाज बाहेरच

वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला आयपीएलदरम्यान दुखापतीला सामोरे जावे लागले. त्याला यामधून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी आणखी अवधी लागणार आहे. टेस्ट मॅचसाठी लागणारा फिटनेस मिळवण्यासाठी त्याला आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे इशांत शर्मा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेला मुकणार आहे. तसेच नवदीप सैनीचा पर्यायी वेगवान गोलंदाज म्हणून टी. नटराजन याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top