Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रोनाल्ड ते डोनाल्ड; वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलचा काळा इतिहास, 45 वर्षांपूर्वीच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या

रोनाल्ड ते डोनाल्ड; वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलचा काळा इतिहास, 45 वर्षांपूर्वीच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या

सामना 1 month ago

मेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील वॉशिंग्टन हिल्टन हॉटेल पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. 45 वर्षांपूर्वी याच हॉटेलबाहेर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.

आता याच हॉटेलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज घुमल्याने अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये व्हाइट हाउस कॉरेस्पोंडेंट्स डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या हाय-प्रोफाईल कार्यक्रमाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प, उपाराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासह पत्रकार, राजकारणी, सिनेकलाकार आणि दिग्गज उद्योजक असे जवळपास 2600 हून अधिक लोक उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्याच्या बेतात असतानाच अचानक हॉटेलच्या लॉबीमध्ये अंदाधुंद गोळीबाराचा आवाज आला.

लोकशाहीत हिंसेला स्थान नाही; वॉशिंग्टनमधील गोळीबाराच्या घटनेचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दात निषेध

गोळीबाराचा आवाज येताचतसिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया आणि उपाराष्ट्राध्य जेडी व्हान्स यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अचानक झालेल्या या घटनेमुळे हॉटेलमध्ये उपस्थित लोकांमध्येही प्रचंड घबरात पसरली होती. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी टेबलटा आडोसा घेतला होता, तर काही जमिनीवरही आडवे झोपले होते. या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी हल्लेखोरालाही ताब्यात घेतले आहे.

Donald Trump Shooting - डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर पार्टीवेळी गोळीबार; हल्लेखोराचा फोटो व्हायरल, इराण युद्धाशी संबंध?

1981 च्या जखमा पुन्हा ताज्या

दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेमुळे 30 मार्च 1981 च्या त्या काळ्या दिवसाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी तत्कालिन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन याच हॉटेलमधील कार्यक्रम संपवून बाहेर पडत असताना जॉन हिंकले ज्युनियर याने त्यांच्यावर रिव्हॉल्वरने गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात रीगन गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यासोबत सिक्रेट सर्व्हिस एजंट टिमॉथी मॅककार्थी, पोलीस अधिकारी थॉमस डेलाहंटी आणि प्रेस सचिव जेम्स ब्रॅडी हे देखील जखमी झाले होते. जेम्स ब्रॅडी यांना या हल्ल्यामुळे कायमचे अपंगत्व आले आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana