Saturday, 23 Jan, 4.42 pm सामना

देश
सहा दिवसात 10 लाख कोरोना लस टोचल्या, हिंदुस्थानात सर्वाधिक वेगवान लसीकरण

हिंदुस्थानसह 180 देशात कोरोनाचे संकट सुरू आहे. आतापर्यंत 7 कोटी 74 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 20 लाखहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी हिंदुस्थानात कोरोना लसीकरण सुरू आहे. एका आठवड्यापूर्वी सुरू झालेल्या लसीकरणात देशात 10 लाखहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे.

हिंदुस्थानात आतापर्यंत 12 लाख 72 हजार 97 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 22 जानेवारी या एका दिवसात संपूर्ण देशात 2 लाख 28 हजार 563 कोरोना लस देण्यात आला. या दिवशी लसीकरणाचे 6 हजार 230 सत्र आयोजन करण्यात आले होते.

हिंदुस्थानात 16 जानेवारी पासून लसीकरणास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यांत तीन कोटी जणांना कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे. त्यात कोरोना योध्यांचा समावेश आहे. 21 जानेवारीपर्यंत 10 लाख 43 हजार 534 जणांचा कोरोनाची लस टोचण्यात आली होती. 21 जानेवारी रोजी 2 लाख 37 हजार 50 जणांना लस देण्यात आली होती. सहा दिवसाला सरासरी एक लाख 74 हजार जणांना कोरोनाची लस देण्यात येत आहे.

जगात आतापर्यंत पाच कोटी 70 लाख कोरोनाच्या लस टोचण्यात आल्या आहेत. सर्वाधिक लस अमेरिकेत दिल्य असून त्यांची संखा एक कोटी 70 लाख इतकी आहे. त्यानंतर चीनमध्ये दीड कोटी, त्यानंतर इंग्लंडमध्ये 54 लाख, इस्राईलमध्ये 33 लाख, युएईमध्ये 23 लाख, जर्मनीमध्ये 15 लाख, इटलीत 13 लाख, तर तुर्की आणि स्पेनमध्ये प्रत्येकी 11 लाख कोरोनाची लस देण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top