सार्वजनिकगणेशोत्सवाबाबतबोलतानालोकमान्यटिळकांनीसांगितलेहोतेकी, ''राष्ट्राच्याअभ्युदयाकरिताअसेउत्सवअसणेगरजेचेआहे. कोणत्याहीलोकांतऐक्याचीवृद्धीहोण्यासजीअनेकसाधनेअसतातत्यापैकीच एक उपास्य दैवत असणे हे एक कारण आहे .'' पण टिळकांचा हा विचार मागे टाकून सध्याची उत्सवी पिढी वेगळय़ा दिशेने निघाली आहे . तरीही सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा हे महत्त्वाचे . अशा वेळी भुलेश्वर सार्वजनिक उत्सव मंडळाची भव्य मूर्ती कोसळून अपघात झाला . याच सरकारच्या काळात मालवणात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला होता . आता श्री गणेश मूर्ती कोसळली . विघ्नहर्त्या … तू का कोपलास ? चिंता करू नकोस , भक्तांना शहाणपण येईल व सगळे सुरळीत होईल !
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ज्या हेतूसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्या राष्ट्रीय आणि सामाजिक कारणांना हरताळ फासण्याचे काम गेल्या काही काळापासून सुरू आहे. त्यास राजकारणी, भक्त व कॉर्पोरेट उद्योग जबाबदार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवांतून 'प्रबोधन' चळवळ मागे पडली व स्पर्धा सुरू झाली. त्या स्पर्धेतून गणेश मंडळांतील वादांना तोंड फुटले हे दुर्दैवी आहे. गणेशाचे आगमन अधिकृतपणे 14 सप्टेंबरला होणार आहे, पण मुंबईतील 'शाही' गणपतींचे आगमन व त्यांचे सोहळे आधीच सुरू झाले आहेत. त्या आगमनातील एका अपघाताने संपूर्ण मुंबई हळहळत आहे. भुलेश्वर येथील गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान मूर्तीचाच तोल गेला. मूर्ती कोसळली व त्यात भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे व पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा मृत्यू झाला. इतर काही जण जखमी झाले. विघ्नहर्त्याच्या स्वागताच्या वेळीच हे विघ्न आल्याने सार्वजनिक उत्सव मंडळांवर दुःखाचे सावट पडले. हा अपघात का झाला? यास जबाबदार कोण? देवाचा कोप का झाला? यावर मंथन सुरू आहे. खराब रस्ते, खड्डे यामुळे मूर्ती असलेल्या ट्रकचा तोल गेला व अपघात झाला असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे, तर मूर्तीला मागच्या बाजूने आधार देण्यासाठी करण्यात आलेले वेल्डिंग तुटल्याने अपघात घडला, असा निष्कर्षही समोर आला. निष्कर्ष कोणताही असो, पण मूर्ती उंच व जास्त वजनदार असल्याने अपघात घडला हे सत्य भक्त तसेच सार्वजनिक मंडळांनी स्वीकारायला हवे. सार्वजनिक मंडळांतील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक देखावे हे पूर्वी
आकर्षणाचेविषय
होते. लोक देखावे पाहण्यासाठी आकर्षित होत. आता देखाव्यांची जागा अतिभव्य, उंच मूर्तींनी घेतली व उंच उंच मूर्तींची स्पर्धाच सुरू झाली. मुंबईच्या रस्त्यांवर अशा उंच गणेश मूर्तींचे आगमन आणि विसर्जनाच्या वेळी अडचणी निर्माण होतात. अनेकदा चौपाटीवरील विसर्जन रखडून पडते व दुसऱ्या दिवसापर्यंत विसर्जन आटोपत नाही. उंच गणेश मूर्तींच्या जीवघेण्या स्पर्धेने काल भुलेश्वरला बळी घेतले, पण असे अपघात याआधीही झाले आहेत. खरे तर 18 फुटांहून उंच मूर्ती नको हा 2004 च्या सुमारास जयंत साळगावकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेला निर्णय आहे. या निर्णयाची आता अंमलबजावणी होत नाही व उंच मूर्तींची स्पर्धा आकाशाला भिडत आहे. एखाद्या गगनचुंबी 'टॉवर्स'प्रमाणे गणेशमूर्ती घडवून त्या मंडळांच्या प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून आणल्या जातात. यात सरकारची काही भूमिका आहे की नाही? सार्वजनिक गणेशोत्सव हा एक भव्य धार्मिक, सांस्कृतिक सोहळा आहेच. या सोहळयास स्वातंत्र्य लढयाचा वारसादेखील आहे. संपूर्ण जगभरातून लोक यानिमित्ताने मुंबईत येतात. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन उत्सव मंडळांना महत्त्वाच्या सूचना देणे व समन्वय निर्माण करणे गरजेचे आहे, पण या उत्सवात राजकीय व आर्थिक लागेबांधे गुंतले आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांतले 'महानायक' वगैरे येतात. गृहमंत्री शहा येतात तेव्हा लालबाग परिसर
दोनेकतासांसाठी'सीलबंद'
केला जातो. लालबागच्या राजाचे नियंत्रण आता म्हणे 'अंबानी' कुटुंबाकडे आहे. याकडे श्रद्धा म्हणून पाहिले तर आता लगेच बाजूच्या प्रख्यात चिंचपोकळी चिंतामणी गणेशोत्सव मंडळाबरोबर अदानी समूहाने अधिकृत भागीदारी केली. चिंचपोकळीचा उत्सव 107 वर्षे जुना आहे. म्हणजे लोकमान्यांनी सुरू केलेल्या उत्सवावर आता उद्योगपतींनी कब्जा केला. गणेशोत्सवही मराठी माणसांच्या हातात राहिलेले नाहीत. देवांना कॉर्पोरेट स्पर्धेत ओढणाऱ्या मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. लोकमान्यांच्या 'सार्वजनिक उत्सव' विचारांना तिलांजली देणारे प्रकार हिंदुत्वाच्या नावाखाली खपवून घेणे म्हणजे कॉर्पोरेटी बाजारात हिंदुत्वाचा लिलाव करण्यासारखे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत बोलताना लोकमान्य टिळकांनी सांगितले होते की, ''राष्ट्राच्या अभ्युदयाकरिता असे उत्सव असणे गरजेचे आहे. कोणत्याही लोकांत ऐक्याची वृद्धी होण्यास जी अनेक साधने असतात त्यापैकीच एक उपास्य दैवत असणे हे एक कारण आहे.'' पण टिळकांचा हा विचार मागे टाकून सध्याची उत्सवी पिढी वेगळय़ा दिशेने निघाली आहे. तरीही सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा हे महत्त्वाचे. अशा वेळी भुलेश्वर सार्वजनिक उत्सव मंडळाची भव्य मूर्ती कोसळून अपघात झाला. याच सरकारच्या काळात मालवणात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला होता. आता श्री गणेश मूर्ती कोसळली. विघ्नहर्त्या… तू का कोपलास? चिंता करू नकोस, भक्तांना शहाणपण येईल व सगळे सुरळीत होईल!

