Dailyhunt
सामना अग्रलेख - महाराष्ट्र धर्माची ललकारी

सामना अग्रलेख - महाराष्ट्र धर्माची ललकारी

सामना 1 week ago

हाराष्ट्रराज्यनिर्मितीचाआज 67 वास्थापनादिन. मात्रआजहीमुंबईतलेरिक्षावालेमराठीबोलण्यासनकारदेतआहेत. राज्यकर्तेत्यांच्यापुढेलोटांगणघालूनमराठीचीसक्तीकरणारानिर्णयस्थगितकरीतआहेत. पुरोगामी महाराष्ट्र अंधश्रद्धा , भोंदूगिरीच्या तडाख्यात सापडला आहे . महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी अस्मिता केंद्रातील महाराष्ट्रद्वेष्टय़ा आणि राज्यातील मिंध्या राज्यकर्त्यांच्या कोंडीत गुदमरते आहे . महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेची मशाल विझविण्याचे राष्ट्रीय कारस्थान सुरू आहे . ते मराठी माणसाला उधळून टाकावेच लागेल . त्यासाठी महाराष्ट्र धर्माची ललकारी पुन्हा एकदा द्यावी लागेल .

राठी माणसांसाठी आजचा दिवस सोन्याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीत जन्मले, ज्या भूमीत त्यांनी जगातले पहिले हिंदवी स्वराज्य निर्माण केले, त्या महाराष्ट्राचा आज निर्मितीचा दिवस आहे. आज महाराष्ट्राचा जन्मोत्सव आहे. या जन्मोत्सवात लाखो-लाखो मराठी जनतेने सामील होऊन महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण केले पाहिजे. सरकारी पातळीवर नेहमीप्रमाणे महाराष्ट्र दिन साजरा होईल. संचलने, सलाम्यांचे कार्यक्रम होतील. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या कल्याणाच्या घोषणांचा कृत्रिम पाऊसही पाडला जाईल. मुंबई मराठी माणसाचीच असे सांगितले जाईल व आम्हीच कसे महाराष्ट्र धर्माचे रक्षणकर्ते यावर बढाया मारून दिवस मावळला की, महाराष्ट्र दिनास विसरून राज्यकर्ते महाराष्ट्राच्या वैभवाची सौदेबाजी सुरू करतील. आजच्या महाराष्ट्राचे हे अस्वस्थ करणारे चित्र आहे. 1 मे हा जसा महाराष्ट्र दिन तसा जागतिक कामगार दिन. महाराष्ट्र निर्मितीचा मंगल कलश 1 मे रोजीच आणायचा मुहूर्त निघाला. कारण 'मुंबई' महाराष्ट्रास मिळाली त्यासाठी गिरणी कामगार, शेतकरी, कष्टकरी लोकांनी लढा दिला. त्या कष्टकऱ्यांची 'मुंबई' आज खरंच राहिली आहे काय? महाराष्ट्र

प्रगतिपथावर

धीपासूनच होता. मात्र हा प्रगतीशील, पुरोगामी महाराष्ट्र आज बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या अजगरी विळख्यात सापडला आहे. हा विळखा सोडवून मराठी जनांच्या डोळय़ांवरची धुंदी उतरवण्याचे कार्य महाराष्ट्रात यापुढे करावे लागेल. महाराष्ट्रीय लोकांना भोंदूबाबा, देवधर्माच्या खुळात अडकवून 'राज्य' लुटण्याचा मार्ग मोकळा करायचा असे एक राष्ट्रीय कारस्थान स्पष्ट दिसत असताना रायगडही जागा होत नाही व मराठी जनही उसळत नाही. शाहिरी पोवाड्यांतील मराठय़ांची वीरता कोठे लोप झाली? हे एक रहस्यच आहे. महाराष्ट्र लाचार आणि मिंध्या राज्यकर्त्यांच्या हातात गेला आहे. मराठी मन एका अस्वस्थतेच्या भोवऱ्यात अडकून पडले आहे. दिल्लीतील सत्ताधारी उठताबसता छत्रपती शिवरायांचे नाव घेत असतात, मात्र त्यांच्याच राजवटीत शालेय अभ्यासक्रमातून छत्रपती शिवरायांचा, मराठा साम्राज्याचा इतिहास हटविण्याची कारस्थाने सुरू आहेत. एनसीईआरटीच्या आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे काय किंवा सीबीएसईच्या शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली इतिहासाला फक्त 68 शब्दांत उरकणे काय, हा सगळा या

कारस्थानांचाचभाग

हे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणून केंद्रातील सरकारचा उदोउदो करणारी सत्ताधारी मंडळी मराठीच्या बोकांडी तिसरी भाषा म्हणून हिंदी बसविण्याचा आटापिटा करीत आहेत. बंद पडणाऱ्या मराठी शाळांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मुंबईसह मोठय़ा शहरांमधील मोक्याच्या जागांवरील मराठी शाळांवरही यांची वक्रदृष्टी गेली आहे. मराठी शाळा बंद पडली की, त्या भूखंडांचे श्रीखंड कसे ओरपता येईल याची स्वप्ने राज्यकर्ते पाहत आहेत. स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीचा आज 67 वा स्थापना दिन. मात्र आजही मुंबईतले रिक्षावाले मराठी बोलण्यास नकार देत आहेत. राज्यकर्ते त्यांच्यापुढे लोटांगण घालून मराठीची सक्ती करणारा निर्णय स्थगित करीत आहेत. या मराठी सक्तीसाठी रेटा देण्याची वेळ मराठी माणसांवर आली आहे. पुरोगामी महाराष्ट्र अंधश्रद्धा, भोंदूगिरीच्या तडाख्यात सापडला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी अस्मिता केंद्रातील महाराष्ट्रद्वेष्टय़ा आणि राज्यातील मिंध्या राज्यकर्त्यांच्या कोंडीत गुदमरते आहे. महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेची मशाल विझविण्याचे राष्ट्रीय कारस्थान सुरू आहे. ते मराठी माणसाला उधळून टाकावेच लागेल. त्यासाठी महाराष्ट्र धर्माची ललकारी पुन्हा एकदा द्यावी लागेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana