Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सामना अग्रलेख- प्रे. ट्रम्प, निव्वळ कोडगेपणा!

सामना अग्रलेख- प्रे. ट्रम्प, निव्वळ कोडगेपणा!

सामना 2 hrs ago

प्रे. ट्रम्पहेमोदींपेक्षाहीपक्केव्यापारी, धोकेबाजआणिकोडगेआहेत. त्यांच्यासमोरसध्याअमेरिकेतीलइंधनमहागाई, घसरणारीलोकप्रियताआणित्याचाआगामीमध्यवर्तीनिवडणुकीतफटकाबसण्याचीभीतीअसेअनेकप्रश्न आहेत . त्या सगळय़ा प्रश्नांचे उत्तर त्यांनी थेट रशियाशीच डिझेल खरेदी करार करून शोधले आहे . यावर युक्रेन काय , युरोपियन राष्ट्रे काय पिंवा त्यांचे ' डिअर फ्रेण्ड ' मोदी काय , थयथयाट करण्याशिवाय दुसरे काय करू शकतात ? ट्रम्प यांना हे पक्के माहीत आहे . म्हणूनच इतरांकडून ' टॅरिफ ' के ' चूहें ' खाके प्रे . ट्रम्प यांची ' बिल्ली ' रशियन बोक्याला म्यॉव म्यॉव करीत आहे ! कोडगेपणाचे दुसरे नाव प्रे . ट्रम्प असे आहे . अर्थात , भारताचे विद्यमान राज्यकर्ते व प्रे . ट्रम्प म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .

प्रे. ट्रम्प, निव्वळकोडगेपणा!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तऱ्हेवाईक आणि कोडगे आहेत. आतापर्यंत त्यांच्याच निर्णयांनी आणि कोलांट उडय़ांनी ते अनेकदा सिद्ध झाले आहे. आता प्रे. ट्रम्प यांनी आणखी एक कोलांट उडी मारली आहे. त्यांनी थेट रशियाकडूनच डिझेल खरेदी सुरू केली आहे. कालपर्यंत हेच ट्रम्प रशियाकडून जगाने कोणत्याही प्रकारचे तेल खरेदी करू नये, यासाठी दरडावणी करीत होते. वेगवेगळय़ा प्रकारे दबाव टाकत होते. 'रशियाकडून तेल खरेदी कराल तर खबरदार! टॅरिफ लावून तुमच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू' अशा धमक्या देत होते. 50 टक्क्यांपासून शंभर टक्क्यांपर्यंत आयात शुल्काचा दांडपट्टा त्यांनी त्यासाठी भारत-चीनसह अनेक देशांवर फिरवला. बरं, दोन महिन्यांपूर्वी खुद्द ट्रम्प महाशयांनीच रशियावर निर्बंध लादणाऱ्या कायद्यावर सही केली. त्याअंतर्गत रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शंभर टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा झाला. मात्र आता त्यांनी रशियाकडूनच डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत करारही केला आहे. या करारानुसार रशियाने अमेरिकेला

तीनलाखटनडिझेल

पाठविण्याचे कबूल केले आहे. त्याचा भाग म्हणून 40 हजार मेट्रिक टन डिझेल भरलेले जहाज अमेरिकेला रवाना झाले आहे. या तीन लाख टनांशिवाय नोव्हेंबरमध्ये 5 लाख टन आणि पुढे 10 लाख टन डिझेल रशिया अमेरिकेला देणार आहे. जगाला रशियन तेलावरून ब्रह्मज्ञान पाजळणारे प्रे. ट्रम्प हे रशियाशी तब्बल 18 लाख टन डिझेल खरेदीचे 'डील' करून अचानक 'कोरडे पाषाण' का झाले? रशियन तेल खरेदी म्हणजे पाप आणि ते करणाऱयांना 'टॅरिफ'चे प्रायश्चित्त घ्यावेच लागेल, अशी फौजदारकी ट्रम्प उठता बसता करीत होते. मग त्यांना आज हेच 'पाप' का करावे लागले? ट्रम्प हे कोडगे असल्याने ते या कोडगेपणालाही अमेरिका हिताचा मुलामा देत आहेत. रशियाकडून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय अमेरिकेच्या हिताचा आहे, असे तुणतुणे वाजवायला त्यांनी सुरुवात केली आहे. रशियाशी केलेला करार अमेरिकन शेतकरी, पशुपालक आणि ट्रक चालक यांच्या हिताचा आहे, अशी मखलाशी ते करीत आहेत. निर्लज्जपणा आणि सोयिस्कर कोलांट उडय़ा ही प्रे. ट्रम्प यांची सवय आहे. रशियाकडून डिझेल खरेदी करताना अमेरिकेच्या पाठबळावर त्या देशाशी लढणाऱ्या या युद्धात उद्ध्वस्त झालेल्या युव्रेनची प्रतिक्रिया काय असेल, याचा जराही विचार ट्रम्प यांनी केला नसेल. स्वार्थ साधण्यासाठी ज्यांच्या

गळय़ातगळे

घातले त्यांचेच गळे कापायचे, इतरांच्या मानेवर पाय देऊन पुढे जायचे, हेच अमेरिकन राज्यकर्त्यांचे धोरण राहिले आहे. ओबामांशी 'चाय पे चर्चा' करणाऱया आणि 'केम छो ट्रम्प' म्हणून ट्रम्प यांच्यासोबत 'तुझ्या गळा माझ्या गळा' करणाऱ्या मोदींचीही बोलती त्यामुळेच बंद झाली आहे. प्रे. ट्रम्प हे मोदींपेक्षाही पक्के व्यापारी, धोकेबाज आणि कोडगे आहेत. त्यांच्यासमोर सध्या अमेरिकेतील इंधन महागाई, घसरणारी लोकप्रियता आणि त्याचा आगामी मध्यवर्ती निवडणुकीत फटका बसण्याची भीती असे अनेक प्रश्न आहेत. त्या सगळय़ा प्रश्नांचे उत्तर त्यांनी थेट रशियाशीच डिझेल खरेदी करार करून शोधले आहे. या निर्लज्जपणाचा त्यांना अजिबात खेद नाही आणि खंतही नाही. यावर युक्रेन काय, रशियावर आर्थिक बंधने घालून त्याच्याशी शत्रुत्व घेणारी युरोपियन राष्ट्रे काय पिंवा त्यांचे 'डिअर फ्रेण्ड' मोदी काय, थयथयाट करण्याशिवाय दुसरे काय करू शकतात? ट्रम्प यांना हे पक्के माहीत आहे. म्हणूनच इतरांकडून 'टॅरिफ' के 'चूहें' खाके प्रे. ट्रम्प यांची 'बिल्ली' रशियन बोक्याला म्यॉव म्यॉव करीत आहे! कोडगेपणाचे दुसरे नाव प्रे. ट्रम्प असे आहे. अर्थात, भारताचे विद्यमान राज्यकर्ते व प्रे. ट्रम्प म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana