संभाजीनगर शहरात कोरोना पाठोपाठ सारीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खासगी रुग्णालयात आणखी सहा रुग्ण आढळून आल्याने हा आकडा 25 वर पोहचला असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिका-यांनी दिली.
शहरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रुग्णांची तपासणी करताना सारीचे रुग्ण आढळून येत आहेत. चार दिवसापूर्वी सारीच्या आजाराने एका बालकाचे निधन होऊन चार जणांना लागण झाल्याचे आढळून आले होते.
त्यापाठोपाठ खासगी रुग्णालयात आणखी सहा रुग्ण सारीचे आढळून आल्याने हा आकडा 25 वर गेला आहे. त्यामूळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. खासगी रुग्णालयातील 14 रुग्णांपैकी सात रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे मनपाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सांगितले.

