Thursday, 04 Mar, 9.18 am सामना

ठळक
सांगलीकरांवर यंदा करवाढीचा बोजा नाही, आयुक्तांकडून 710 कोटींचे अंदाजपत्रक 'स्थायी'ला सादर

सांगली महापालिकेचे 2020-21चे सुधारित आणि 2021-22चे मूळ अंदाजपत्रक आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांच्याकडे सादर केले. आयुक्तांनी सादर केलेले हे अंदाजपत्रक 710 कोटींचे आणि 43 लाख शिलकीचे असून, या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.

प्रशासनाच्या मूळ अंदाजपत्रकात रस्तेविकास, क्रीडांगण विकास, ड्रेनेज योजना, महापालिका शाळा विकास, पाणीपुरवठा तसेच जलनिस्सारण यासाठी तरतूद आहे. महिला बालकल्याणसाठी पूर्वीइतकीच तरतूद धरण्यात आली आहे. याचबरोबर अखर्चित निधीसुद्धा पुढील वर्षामध्ये वर्ग करण्यात आला असून, तोही वापरता येणार आहे. याचबरोबर शहराच्या प्रदूषणविषयक उपायांसाठी शासनाच्या सूचनेनुसार 25 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. याचबरोबर समाजकल्याणचा 5 टक्के निधीही पुढील वर्षात वर्ग करण्यात आला आहे. याचबरोबर उपयोगकर्ता कर, मार्केट लायसेन्स दरात मागील वर्षी सुधारणा केल्यामुळे पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही, असे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top