Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संत रुक्मिणीबाई केंकरे

संत रुक्मिणीबाई केंकरे

सामना 6 days ago

रुक्मिणीबाई केंकरे म्हणजेच सोंसुबाई या संत कवयित्री होत्या. सावर्डे येथील रुक्मिणबाईंना अल्पवयातच वैधव्य आले. मात्र पुढचा हा काळ पूजाअर्चा व संत साहित्याचा अभ्यास करण्यात घालवू लागल्या.

घरातही तसेच वातावरण असल्याने त्यांचाही ओढा वाढत गेला आणि त्या अभंग रचू लागल्या. साधारण 1000 पेक्षा अधिक अभंग त्यांनी रचले. रामदास स्वामींनी सावर्डे, सावंतवाडी येथे मठाची स्थापना केली. यामुळे सोंसुबाईंवर समर्थांच्या विचारांचा प्रभाव होता.

त्यांच्या अभंगातही समर्थांच्या वैचारिक शक्तीचा भास होतो. सोयराबाईंनी जसे विटाळाबाबत जनजागृती केली तसेच कार्य रुक्मिणीबाईंनीही केले. एका विधवेचे दुःख त्यांनी त्यांच्या अभंगात मांडले आहे. 'मी जरी जहाले चंडाळीण।

तरी मज प्रतिपाली। देवा जगजेठी। पायी मारीन मिठी। ऐसी करा।' त्याचा अर्थ असा की, मी जरी विधवा असले तरी दर महिन्याला मला पाळी येते.

त्यात माझा दोष नाही. यामागे विटाळ वाईट नाही हाच रुक्मिणीबाईंचा भाव आहे. विटाळात देवाला शिवायचे की नाही हाच प्रश्न त्यांना पडला होता. समर्थ संप्रदायातील अशा तडफदार स्त्राr संतांच्या अभंगांची नोंद गिरीधरस्वामी यांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana