Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सर्व देशाला माहितीये, पूर्ण सिस्टम एका बाजूला आणि आम्ही. पराभूत झाल्यानंतर विनेश फोगाट स्पष्टच बोलली

सर्व देशाला माहितीये, पूर्ण सिस्टम एका बाजूला आणि आम्ही. पराभूत झाल्यानंतर विनेश फोगाट स्पष्टच बोलली

सामना 6 days ago

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटचे Asian Games 2026 मध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. शनिवारी (30 मे 2026) नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या अत्यंत अटीतटीच्या पात्रता फेरीत 31 वर्षीय विनेशला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

53 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयलने विनेशचा 6-4 अशा फरकाने पराभव करत तिला स्पर्धेतून बाहेर केले. उपांत्यपूर्व फेरीत हरियाणामधल्या निशूविरुद्ध खेळताना विनेश एका वेळी 0-5 अशी मागे असताना तेथे प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यान प्रशिक्षक आणि हिंदुस्थानी कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद झाले होते. या सर्व मानसिक दबावातून मार्ग काढत विनेशने उपांत्य फेरी गाठली खरी, मात्र मीनाक्षीविरुद्धची तिची झुंज अपयशी ठरली आणि तिचे आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीट हुकले.

या अनपेक्षित पराभवानंतर आणि सामन्यादरम्यान झालेल्या गदारोळावर विनेश फोगटने ANI शी बोलताना आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, "मी चांगली कामगिरी केली, मी जितके सर्वोत्तम करू शकत होते तितके केले… मला वाटते मी आणखी कठोर परिश्रम करेन. मला काहीही बोलण्याची गरज नाही. सर्व गोष्टी किती न्याय्य पद्धतीने झाल्या आणि कोणत्या गोष्टी झाल्या नाहीत, हे सर्वांनी पाहिले आहे. किती फेरफार झाले हे सर्वांना माहीत आहे. संपूर्ण देशाला हे ठाऊक आहे आणि हे बऱ्याच काळापासून सुरू आहे; प्रत्येकजण ते पाहू शकतो. संपूर्ण माध्यमं तिथे पाहत होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत समस्या सुरूच होत्या आणि संध्याकाळनंतर प्रत्येक गुणासाठी भांडण सुरू होते. संपूर्ण यंत्रणा एका बाजूला उभी आहे आणि आम्ही सगळे दुसऱ्या बाजूला उभे आहोत, पण आम्ही त्यांच्याविरुद्ध अभिमानाने आणि खंबीरपणे उभे आहोत आणि आमचा हा लढा पुढेही सुरूच राहील, असे आम्ही अभिमानाने सांगू शकतो." असं विनेश फोगाट म्हणाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana