Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सासऱ्याने जोरात धक्का दिल्याने सुनेचा मृत्यू; विरारच्या नारंगी गावातील घटना

सासऱ्याने जोरात धक्का दिल्याने सुनेचा मृत्यू; विरारच्या नारंगी गावातील घटना

सामना 1 week ago

रगुती वादातून झालेल्या धक्काबुक्कीत सासऱ्याने जोराचा धक्का दिल्याने सुनेचा मृत्यू झाल्याची घटना विरारच्या नारंगी गावात गुरुवारी सकाळी घडली. प्राची पाटील असे दुर्दैवी सुनेचे नाव असून या घटनेप्रकरणी सासरे गणपत पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राची पाटील यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलीचे मातृछत्र हरपले आहे.

प्राची पाटील (२८) ही महिला नारंगी गावातील भगत आळी येथे पती कल्पेश व सासरे गणपत पाटील यांच्यासोबत राहात होती. आज सकाळी प्राची व त्यांचे सासरे या दोघांमध्ये वाद सुरू झाला. गणपत पाटील यांनी सुनेला शिवीगाळ केली असल्याची माहिती मिळताच प्राचीचा भाऊ विशाल हा तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी घरी आला होता.

प्राचीचा भाऊ घरी आला तेव्हा पुन्हा भांडण सुरू झाले. सासरे गणपत पाटील यांच्या खांद्यावर असलेली मुलगी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सून प्राची हिने केला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा धक्काबुक्की झाली. प्राची आपल्या मुलीला खेचत असताना गणपत पाटील यांनी तिला एवढा जोरात धक्का दिला की ती खाली कोसळून गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला दुखापत झाली.

स्थानिक रहिवासी आणि कुटुंबीयांनी तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्राचीचे सासरे गणपत पाटील यांना अटक केली आहे. सासरच्या मंडळींकडून प्राचीचा हुंड्यासाठी छळ सुरू होता का याचा पोलीस कसून तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana