Monday, 30 Sep, 11.47 am सामना

ठळक बातम्या
सौदी अरेबिया हिंदुस्थानात करणार गुंतवणूक, पाकड्यांच्या हातात करवंटी

सौदी अरेबियाच्या युवराजाला हिंदुस्थानची भुरळ पडली असून हा देश हिंदुस्थानात तब्बल 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. पेट्रोल, पायाभूत सोयीसुविधा आणि खाण उद्योग यांच्यासहित विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या हाती मात्र करवंटी आली आहे. सौदी अरेबियाने पाकडय़ांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सौदीकडून प्रचंड आशा होत्या परंतु सौदीने हिंदुस्थानची निवड केली. हिंदुस्थानात गुंतवणूक करणे हे व्यावहारिकदृष्टय़ा अत्यंत फायद्याचे असून भविष्यात याचा मोठा फायदा होणार आहे. हिंदुस्थानसोबतचे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी सौदीकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे सौदीचे राजदूत अल साती यांनी म्हटले आहे.

युवराज सलमान यांचे व्हीजन 2030

तेलपुरवठा, घाऊक इंधन विक्री यांच्यासह पेट्रोलियम, लुब्रिकेंट बाजारात अरामको कंपनीची गुंतवणूक कंपनीच्या जागतिक विस्ताराच्या दृष्टीने करण्यात येणार आहे. सौदी अरबचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे व्हीजन 2030 डोळ्यांसमोर ठेवून ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. हिंदुस्थान सौदी अरेबियाकडून आपल्या गरजेनुसार 17 टक्के कच्चे तेल आणि 32 टक्के एलपीजी खरेदी करतो. दोन्ही देशांमध्ये संयुक्त भागीदारी आणि गुंतवणुकीच्या 40 हून अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचेही सौदीच्या राजदूतांनी सांगितले.

सध्या हिंदुस्थान आणि सौदी अरेबिया यांच्यात 34 अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार होतो.

2019 मध्ये दोन्ही देशांमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

दोन्ही देशांमध्ये पेट्रोलियमजन्य उत्पादन आणि खाणकामसारख्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>