Wednesday, 23 Sep, 5.00 am सामना

ठळक बातम्या
शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी बजेट फोनकडे ग्राहकांचा कल

कोरोनाच्या संकटाने आपले जग सोशल डिस्टन्सिंगपासून ते व्हर्च्युअल क्लासरूमपर्यंत बदलले आहे. जीवनशैलीतील या बदलांमुळे लोक कधी नव्हे इतका स्मार्टफोनचा वापर आपल्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षांच्या पूर्ततेसाठी लोक करू लागले. फ्लिपकार्टच्या अहवालानुसार या काळात मनोरंजनापासून ते शिक्षणापर्यंतच्या आपल्या गरजा भागविण्यासाठी लोकांची पसंती बजेट स्मार्टफोनला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

कोरोनाच्या या संकटात विद्यार्थी घरूनच कशाप्रकारे शिक्षण घेत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी फ्लिपकार्टने हे सर्वेक्षण केले होते. बहुतांश लोक सध्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवत असून प्रत्येकाच्या मनोरंजन, व्यावसायिक आणि शैक्षणिक गरजा वेगवेगळ्या असल्याने घरात अनेक उपकरणांची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे, अनेक लोक बजेटबाबत जागरुक झाले आहेत. विशेषत: स्मार्टफोन घेताना हे जाणवले. कोरोनाआधी तुलनेत जूनपासून फ्लिपकार्टवर 10 हजार रुपयांखालील उत्पादनांचा शोध घेतला जाण्याचे प्रमाण 60 टक्क्यांनी वाढले आहे. 51 दशलक्षांहून अधिक जणांनी 10 हजार रुपयांखालील बजेट स्मार्टफोनमध्ये रस दाखवला आहे, असे अभ्यासातून पुढे आले आहे. तसेच स्मार्ट फोनवर एकाचवेळी अनेक कामे केली जाणे, ही काळाची गरज असल्याने फ्लिपकार्टवर बॅटरीशी संबंधित बाबींचा शोध घेण्याच्या प्रमाणात मार्चपासून दुप्पट वाढ झाली आहे.

छोटी शहरे टॉपवर

परवडणाऱ्या दरातील डेटा प्लॅन्समुळे छोट्या शहरांमधील स्मार्टफोनची मागणी प्रचंड वाढली आहे. परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोनच्या मागणीत सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशचा आहे. त्यानंतर बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक आहे. एकूण मागणीतील 70 टक्के वाटा द्वितीय श्रेणी आणि त्याखालील शहरांचा आहे. यात गोरखपूर, रायपूर, सिवान, देवरिया, हिसार, मदिनीपूर आणि आझमगढ आदी शहरांचा समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top