Monday, 30 Sep, 10.40 am सामना

क्रीडा
शांता रंगास्वामी यांचा राजीनामा

क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) सदस्या आणि इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या (आयसीए) संचालक अशा दोन पदांवर कार्यरत असलेल्या शांता रंगास्वामी यांनी बीसीसीआयचे एथिक्स अधिकारी डी. के. जैन यांच्याकडून हितसंबंधाच्या मुद्यावर नोटीस पाठवल्यानंतर दोन्ही पदांचा राजीनामा दिला. त्यांनी दोन्ही पदांवरून माघार घेतली. क्रिकेट सल्लागार समितीची बैठक एका वर्षात एकवेळ किंवा दोन वर्षांत एकवेळ होत असे, पण तरीही हितसंबंधाचा मुद्दा पुढे आला हे समजण्यापलीकडे आहे, पण असो, मला काहीतरी वेगळे करायचे आहे. त्यामुळे मी राजीनामा दिलाय, असे रंगास्वामी म्हणाल्या.

योग्य व्यकती मिळणे अवघडच

हितसंबंधाच्या मुद्दय़ामुळे व्यवस्थापनासाठी योग्य माजी क्रिकेटपटू मिळणे अवघड होणार आहे. हा नवा नियम खरोखरच कठोर आहे, पण मला क्रिकेट सल्लागार समितीत काम करायला मिळाले हे भाग्य समजते. तसेच याचा मला अभिमान आहे, असे शांता रंगास्वामी यावेळी म्हणाल्या.

10 ऑक्टोबरपर्यंत मुदत

डी. के. जैन यांनी क्रिकेट सल्लागार समितीला नोटीस पाठवली असून येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत त्यांना उत्तर देणे अपेक्षित आहे. या समितीत कपिल देव, शांता रंगास्वामी व अंशुमन गायकवाड यांचा समावेश आहे. हितसंबंधाच्या मुद्दय़ावरून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याच कारणामुळे शांता रंगास्वामी यांनी राजीनामा दिलाय.

… तर टीम इंडियाच्या प्रशिक्षक निवडीची प्रकिया पुन्हा होणार

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे संजीव गुप्ता यांनी सीएसीविरोधात तक्रार केली होती. क्रिकेट सल्लागार समितीकडूनच रवी शास्त्राr यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डी. के. जैन आता कोणता निर्णय घेताहेत हे पाहणे रंजक ठरणार आहे. क्रिकेट सल्लागार समिती अडचणीत सापडल्यास टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड प्रकिया पुन्हा सुरू होऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>