Friday, 24 Sep, 10.37 am सामना

ठळक
शेअर बाजाराची विक्रमी उसळी; सेन्सेक्स 59,957 वर

साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराने मोठी उसळी घेतलेली पाहायला मिळाली. ट्रेडिंगदरम्यान प्रथमच सेन्सेक्सने 59,957 आणि निफ्टीने 17,843 ची उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्स 958 अंकांनी वाढून 59,885 आणि निफ्टी 276 अंकांनी चढून 17,823 वर बंद झाला. यापूर्वी सेन्सेक्स 59,358 वर उघडला, निफ्टी 17,670 वर उघडला होता. रिअल्टी, मेटल आणि बँकिंग शेअर्सनी बाजारात तेजी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजारावरील रिअल्टी इंडेक्स 8.66 टक्के च्या वाढीसह बंद झाला. निफ्टी बँक 2.24 टक्के आणि मेटल इंडेक्स 1.65 टक्क्यांवर बंद झाला. दुसरीकडे बजाज फिनसर्व 4.63 टक्क्यांच्या वाढीसह निफ्टीचा टॉप गेनर बनला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top