Dailyhunt
शेतजमीन दहा दिवसांत ऑनलाईन 'एनए' होणार

शेतजमीन दहा दिवसांत ऑनलाईन 'एनए' होणार

सामना 3 weeks ago

शेतजमीन बिनशेती (एनए) करायची असेल तर त्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याची आवश्यकता असणार नाही. अवघ्या दहा दिवसांत ही 'एनए' प्रक्रिया ऑनलाईन करता येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बांधकाम व्यावसायिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व्रेडाई संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित केली होती.

त्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. एनए परवान्यासाठी क्लिस्ट प्रक्रियेमुळे बराच वेळ लागतो. त्यामुळे महसूल विभागाने कालबद्ध कार्यक्रम बनवला आहे, असे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana