Dailyhunt
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या आत्महत्या पाहत बसणार का? संजय राऊत यांचा राज्य सरकारला सवाल

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या आत्महत्या पाहत बसणार का? संजय राऊत यांचा राज्य सरकारला सवाल

सामना 2 weeks ago

जेव्हा महाराष्ट्रात गरीब शेतकरी सातत्याने आत्महत्या करतोय, शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळत नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या आत्महत्या पाहत बसणार का?

असा सवालही संजय राऊत यांनी सरकारला विचारला आहे.

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, जेव्हा महाराष्ट्रात गरीब शेतकरी सातत्याने आत्महत्या करतोय, शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळत नाही. खासकरून मी जे मुख्यमंत्र्यांना कळवले आहे, मला नाशिकमधले अष्टलक्ष्मी साखर कारखान्याचे काही शेतकरी मला भेटले. त्यांना मी विचारलं की कारखान्याची मालकी कुणाकडे आहे? त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईकांकडे या कारखान्याची मालकी असल्याचे सांगितले. त्यानंतर तो कारखाना माजी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे गेला. नंतर गोडसे यांनी पुण्यातल्या प्रवीण गावडे या त्यांच्या माणसाला हा साखर कारखाना चालवायला दिला. यात त्या शेतकऱ्यांचा दोष काय? शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस, कष्ट दिले आहे. किमान सहा महिन्यात त्यांना ऊसाचे पैसे मिळत नसतील तर काय शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का? त्यामुळे शेतकऱ्यांना पत्र लिहून कळवले आहे की या पैकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तर जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. चार दिवसांपूर्वी अत्यंत निराश अवस्थेत मला शेतकरी भेटले. आणि अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखाना हा एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या नातेवाईकांनी किंवा हेमंत गोडसे यांच्या ताब्यात असेल. तर हे सत्तेतले लोक आहेत. मुख्यमंत्री काय कारवाई करणार? शेतकऱ्यांना असं वाऱ्यावर सोडून त्यांच्या आत्महत्या पाहत बसणार आहेत? हा माझा साधा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच पश्चिम बंगालमध्ये मोठ्या बहुमताने ममता बॅनर्जी जिंकत आहेत. केरळमध्ये काँग्रेसप्रणित आघाडी, तमिळनाडूत द्रमुकचा विजय होत आहे. आसाममध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. आणि पुद्दुचेरीत द्रमुक-काँग्रेसचा विजय होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठा फौजफाटा आणला गेला आहे. याचा अर्थ बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या बाजूने जो निकाल येणार आहे तो निर्णय केंद्र सरकार मानायला तयार नाही. आणि जोर जबरदस्तीने ईव्हीएम हातात घेऊन तो निर्णय बदलायचा आहे असेही संजय राऊत म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana