Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिंदे गट एक नंबर ढोंगी आणि भंपक; पुण्यातील पोस्टवरून संजय राऊत यांची टीका

शिंदे गट एक नंबर ढोंगी आणि भंपक; पुण्यातील पोस्टवरून संजय राऊत यांची टीका

सामना 1 week ago

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील नेते स्वतःला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य मानत असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्या कृतीत आणि भूमिकेत विरोधाभास दिसून येत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

‘एकनाथ शिंदे आणि त्यांची लोकं ही एक नंबरची ढोंगी आणि भंपक आहेत. स्वतःला हिंदुहृदयसम्राटांचे खरे वारसदार म्हणतात, आणि आनंद दिघे माझे गुरू असल्याचे सांगतात; पण बाळासाहेब ठाकरे आणि तुमचा काय संबंध? काल हे लोक घाबरले. अमित शहा इथे काळोखात, रात्री दोन वाजता आले’, असे संजय राऊत म्हणाले.

शिंदे गटाला सवाल करत संजय राऊत म्हणाले की, ‘अमित शहा यांच्या कृपेने स्वतःला शिवसेनेचा प्रमुख मानणारे हे लोक जनतेला काय सांगणार? मात्र, त्या स्वागताच्या फलकावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही आणि स्वतःचे गुरू मानणारे श्री आनंद दिघे यांचाही फोटो नाही. ही कसली भीती? मालकाने सांगितले आहे का की, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा नाही?’

‘हे काल पुण्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या होर्डिंगवर स्पष्ट दिसले. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही आणि स्वतःचे गुरू म्हणून मिरवणारे दिघे साहेब यांचाही फोटो नाही. हे ढोंगी आणि डरपोक लोक आहेत, जे अमित शाह यांना घाबरतात’, अशा कडक शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana