Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवात 7 कोटी 81 लाखांहून अधिकची देणगी प्राप्त; तीन लाखांवर साईभक्तांनी घेतले दर्शन

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवात 7 कोटी 81 लाखांहून अधिकची देणगी प्राप्त; तीन लाखांवर साईभक्तांनी घेतले दर्शन

सामना 2 weeks ago

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने बुधवार दिनांक 28 जुलै 2026 ते शुक्रवार दिनांक 30 जुलै 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवात देशभरातून आलेल्या भाविकांकडून एकूण 07 कोटी 81 लाख 13 हजार 377 रुपयांची विक्रमी देणगी प्राप्त झाली आहे.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

सदर देणगी मध्ये रोख स्वरुपात रुपये 02 कोटी 04 लाख 35 हजार 557 दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून, देणगी काऊंटरवर 01 कोटी 25 लाख 47 हजार 935 रुपये, पी.आर.ओ.देणगी 87 लाख 14 हजार, डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 02 कोटी 07 लाख 84 हजार 701 रुपये, परकीय चलनाद्वारे 05 लाख 65 हजार 991 रुपये, सोने 1,125.570 ग्रॅम प्राप्त झाले असून त्याचे मुल्‍य रक्कम रुपये 01 कोटी 46 लाख 74 हजार 544 व चांदी 2,376.500 ग्रॅम प्राप्त झाली असून तीचे मुल्‍य रक्कम रुपये 03 लाख, 90 हजार 649 असे आहे.

श्री गुरूपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारण 03 लाखांहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधीमध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे 01 लाख 94 हजार 285 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा तर 39,611 अन्नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. दर्शन रांगेत 01 लाख 65 हजार 200 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत 71 लाख 07 हजार 360 रूपये सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्या माध्यमातून प्राप्त झाले. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, द्वारामवती निवासस्थान, साई आश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या 39 पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana