ठळक
शिवसेनाप्रमुखांना सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांतून आदरांजली

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज दुसऱया दिवशीही मुंबईसह राज्यभरातून विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. आरोग्य तपासणी शिबिरांबरोबरच रुग्णांना फळवाटप, ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय वस्तूंचे वाटप, क्रीडा स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडल्या. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून काम केलेले आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि सफाई कर्मचाऱयांचाही ठिकठिकाणी सन्मान करण्यात आला.
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली (मुंबईचा राजा) यांनी साईबाबा म्युनिसिपल हायस्कूल लालबाग येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
केईएम रुग्णालय, सर जे. जे. रुग्णालय, जे. जे. महानगर रक्तपेढी, नायर रुग्णालय यांच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे, सरचिटणीस स्वप्नील परब, उपाध्यक्ष नंदकुमार बागवे, हिशोब तपासणीस अमित टवते यांनी दिली आहे.
दहिसर कांदरपाडा येथे शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत विभागातील विविध गृहनिर्माण संस्थांना फळझाडांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी स्मृतिस्तंभास मानवंदनादेखील दिली. यावेळी मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला शाखा संघटक ज्युडीथ मेंडोन्सा, जितेन परमार व दर्शित कोरगावकर आदी उपस्थित होते.
स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना आणि टाटा स्मारक रुग्णालयाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाटा स्मारक रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, शैक्षणिक संचालक श्रीपाद बाणवली, भारतीय कामगार सेना युनिटचे अध्यक्ष तुकाराम गवळी, उपाध्यक्ष प्रीतम शिंदे, राहुल सावंत, नंदकिशोर कासकर, महेंद्र इंदुलकर, ललित फोंडेकर, जगदीश सोळंकी, संतोष शिंदे, प्रमोद गायकवाड, सदानंद चव्हाण, दर्पण ठाकूर, रामकृष्ण शेरवाडे, आदी उपस्थित होते.
विलेपार्ले पश्चिम येथील मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे रुग्णांना ऊर्जा देणारे ओजस्वी प्रकाशचित्र म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना व उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांच्या वतीने उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांच्या हस्ते बसविण्यात आले. याप्रसंगी रुग्णालय अधिष्ठाता पिनाकिन गुज्जर, म्युनिसिपल कामगार सेनेचे सुनील चिटणीस, सुनील आडिलकर आदी उपस्थित होते.