Dailyhunt
शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवे! आज महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करणार

शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवे! आज महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करणार

सामना 2 weeks ago

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीकडून दानवे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून गुरुवारी सकाळी 11 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

महाविकास आघाडीकडून शिवसेनेने ही निवडणूक लढवावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने आणि कॉँग्रेसने मांडली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे असा त्यांचा आग्रह होता, मात्र शिवसेनेकडून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून देण्यात येणाऱ्या नऊ जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीला एक तर महायुतीला आठ जागा मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस उमेदवार देणार

कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांची नावे चर्चेत आहेत. थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

अजितपवारगटातउमेदवारीसाठीरस्सीखेच

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक उमेदवार विधान परिषदेवर सहज निवडून जाणार आहे. या एका जागेसाठी पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू असून जवळपास 75 जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची असा प्रश्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापुढे आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अनेक नावांवर चर्चा झाली. माजी आमदार झिशान सिद्दिकी यांचे नाव आघाडीवर असले तरी उमेदवारीची माळ कुणाच्या गळय़ात पडणार याची उत्सुकता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana