Dailyhunt
शिवसेनेने जपला रुग्णसेवेचा वसा; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

शिवसेनेने जपला रुग्णसेवेचा वसा; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

सामना 1 week ago

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'मातोश्री' येथे तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असून जनसेवेचा वारसा अखंड सुरू राहील, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकारातून या रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मुंबईतील रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे. या सोहळय़ाला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, उपनेते मिलिंद वैद्य, सुबोध आचार्य, सचिव साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्पेकर, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, उपसचिव प्रवीण महाले, विभाग संघटक श्रद्धा जाधव, पद्मावती शिंदे, भारतीय विमा कर्मचारी सेना सरचिटणीस दिनेश बोभाटे व मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana