Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्रावणात देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवा गोव्याचा हा खास गोड पदार्थ

श्रावणात देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवा गोव्याचा हा खास गोड पदार्थ

सामना 1 day ago

सुकरुंडे हा गोवा, कारवार आणि मंगलोरकडील कोकणी समाजाचा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. हा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ व गोड असा चवदार पक्वानाचा प्रकार आहे, जो प्रामुख्याने गणेशोत्सवासारख्या सणांना बनवला जातो.

तुम्ही देखील ही सोप्पी रेसिपी आता सणाच्या दिवसात बनवू शकता.

साहित्य – चणा डाळ, गूळ, वेलची, काजू बदाम, मीठ, ओले खोबरे, तूप, तांदळाचे पीठ, बेसण, हळद, तेल.

कृती – चण्याची डाळ शिजवून घ्या त्यात तूप, गूळ, वेलची टाकून त्याचे पुरण तयार करा. त्यात ओले खोबरे व सुका मेवा टाका. सुकरंड्याचे सारण तयार झाले. त्यानंतर एका भांड्यात तांदळाचे पीठ, बेसण घेऊन त्यात पाणी घाला. भजीसाठी बनवतो तसे बॅटर तयार करा. त्यात सारणाचे गोळे तयार करून ते बटाट्या वड्यासारखे तळून घ्या. गोव्याचा पारंपारिक पदार्थ सुकरुंडे तयार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana