Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शूटिंगदरम्यान रश्मिका मंदानाला गंभीर दुखापत? डाॅक्टरांकडून 6 आठवडे विश्रांतीचा सल्ला

शूटिंगदरम्यान रश्मिका मंदानाला गंभीर दुखापत? डाॅक्टरांकडून 6 आठवडे विश्रांतीचा सल्ला

सामना 3 weeks ago

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्याबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. वृत्तांनुसार, आगामी 'रणबली' आणि 'मैसा' या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान तिला कमरेला गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

मात्र, या वृत्ताला अद्याप रश्मिका किंवा तिच्या टीमकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एका नृत्य दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान रश्मिकाच्या कमरेतील नस दुखावल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तिच्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण काही काळासाठी स्थगित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची दुखापत सामान्यतः तीव्र शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येते. कलाकारांनाही ॲक्शन आणि नृत्य दृश्यांदरम्यान मोठा शारीरिक ताण सहन करावा लागतो, यामुळे अशा दुखापतींचा धोका वाढतो. असे वृत्त एबीपी न्यूजकडून देण्यात आले आहे. दरम्यान, रश्मिका नुकतीच ‘कॉकटेल २’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि कृती सॅनॉन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

रश्मिकाच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘रणबली’, ‘मैसा’, ‘ॲनिमल पार्क’, AA22xA6’आणि ‘पुष्पा ३: द रॅम्पेड’ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ‘रणबली’मध्ये ती विजय देवरकोंडा याच्यासोबत दिसणार असून हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 ला प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana