Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्पर्धा परीक्षा, सीईटीत प्रचंड भ्रष्टाचार; भाजप आणि शिंदे गटाचे मंत्री, अधिकारी सामील, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

स्पर्धा परीक्षा, सीईटीत प्रचंड भ्रष्टाचार; भाजप आणि शिंदे गटाचे मंत्री, अधिकारी सामील, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

सामना 2 weeks ago

राज्यात स्पर्धा परीक्षा, सीईटी परीक्षा आणि शिक्षण विभागातील टेंडर्स प्रक्रियेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून त्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आणि अधिकारीही सामील असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

पुराव्यादाखल त्यांनी सविस्तर सादरीकरणही केले. पोलीस भरतीतील बनावटगिरी असो किंवा परीक्षांमधील घोटाळे, राज्यामध्ये सध्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे घर भरण्याचे काम सुरू आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

एकालाच कोट्यवधींची टेंडर्स
‘टीसीएस’ सारख्या नामांकित कंपनीचे सर्वात कमी रकमेचे टेंडर तीनदा रद्द करून ‘एज्युस्पार्क’ कंपनीच्या मालकाच्या वेगवेगळ्या मित्र कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्यात आली, असे त्यांनी सांगितले. या कंपनीने राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आदी ७ विभागांमध्ये काम मिळवले.

विखे पाटील राजीनामा द्या!पर्सेटाईल काढण्याचे सूत्र दाखवले जावे, सीईटी परीक्षेच्या निकालाचे फॉरेन्सिक ऑ डिट करून २०२३ पासून सीईटी परीक्षेच्या निकालाची आणि एज्युस्पार्क कंपनीला दिलेल्या सर्व टेंडरची सखोल चौकशी करावी, तसेच या संपूर्ण भ्रष्टाचाराप्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

लवकरच पुण्यात महामोर्चा काढणार
या भ्रष्टाचाराविरोधात पुण्यात महामोर्चा काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या लढ्यात सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. एमपीएससीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी, सीईटी आणि प्राध्यापक भरतीमधील घोटाळ्यांची चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

व्हीआयपी मुलांना सीईटीत बोगस गुण
इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यात येते. ते काम महायुती सरकारने एज्युस्पार्क या कंपनीला दिले आहे. दहावी-बारावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी सीईटीमध्येही उत्तम गुण मिळवायचे. परंतु २०२० ते २०२६ या कालावधीत झालेल्या सीईटी परीक्षेच्या निकालाचे विश्लेषण केल्यावर २०२३ नंतर यामध्ये अचानक मोठी तफावत दिसून येऊ लागली आहे. २०२६ च्या सीईटीमध्ये टॉ प १०० विद्याथ्यपैिकी केवळ ४३ विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डात पीसीएममध्ये ८५ टक्केपेक्षा अधिक गुण आहेत. एकाच घरातील, एकाच केंद्रावरील व्हीआयपी मुलांना समान व जास्त पर्सेटाईल मिळत आहेत, तर दुसरीकडे २०० पैकी १०४ गुण मिळूनही विद्यार्थ्यांचे पर्सेटाईल केवळ ९ येत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana