Wednesday, 18 Mar, 5.00 am सामना

ठळक बातम्या
सुखी, निरोगी आयुष्यासाठी फेसबुकपासून अंतर राखा


साधारणतः लोक फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या प्लॅटफॉर्मवर तासनतास घालवतात. यामुळे त्यांचा वेळ तर वाया जातोच, पण शिवाय आजारी पडण्याची किंवा तणावग्रस्त होण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे आनंदी आणि निरोगी राहायचे असेल तर फेसबुकसारख्या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मपासून अंतर राखावे लागेल. एवढेच नाही तर सुखी आयुष्यासाठी दिवसभरातून केवळ 25 मिनिटेच सोशल मीडियाचा वापर करायला हवा. काम्प्युटर इन ह्यूमन बिहेवियर या जर्नलमधील एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे. संशोधनकर्त्यांनी त्या 286 जणांवर संशोधन केले आहे, जे दिवसभरात सरासरी एक तासापेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर करत होते. तीन महिन्यांपर्यंत चाललेल्या संशोधनात निदर्शनास आले आहे की, 25 मिनिटांपेक्षा कमी वेळ सोशल मीडियाचा वापर करणारे जास्त आनंदी होते. त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा झाली. त्यांनी पुटुंबाला पुरेसा वेळही दिला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top