Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा, उपराष्ट्रपतींकडे सादर केले पत्र

सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा, उपराष्ट्रपतींकडे सादर केले पत्र

सामना 3 weeks ago

राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची दिल्ली येथे भेट घेत त्यांनी आपले राजीनामा पत्र सादर केले.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. या मतदारसंघातून त्या सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत.

पार्थ पवार राज्यसभेवर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी 9 एप्रिल रोजी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

पवार परिवाराच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेत

शरद पवार हे तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे या देखील लोकसभेमध्ये खासदार आहेत. तसेच शरद पवार यांचा पुतण्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे देखील राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेमध्ये दिसणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana