Dailyhunt
स्वरूपानंद देशमुख मस्साजोगचे नवे सरपंच, संतोष देशमुख यांच्या पत्नीचा धक्कादायक पराभव

स्वरूपानंद देशमुख मस्साजोगचे नवे सरपंच, संतोष देशमुख यांच्या पत्नीचा धक्कादायक पराभव

सामना 2 weeks ago

माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर झालेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव करत या निवडणुकीत बाजी मारली आहे.

या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले होते.

बीड जिह्यातील मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. वर्षभरानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख मैदानात उतरल्या होत्या. ही निवडणूक बिनविरोध करा, अशी मागणीही अनेकांनी केली होती. निवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपला काwल दिला आहे. या निवडणुकीत 914 मते स्वरूपानंद देशमुख यांना मिळाली, तर अश्विनी देशमुख यांना 822 मतांवर समाधान मानावे लागले. पुणी काय आरोप केले हे मला माहिती नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की माझी जनता माझ्यासोबत आहे. आज मतदानरूपी आशीर्वादातून त्यांनी हे सिद्ध केले आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी याआधीही कायम पुढेच होतो आणि सदैव त्यासाठी मी कायम पुढेच राहणार आहे, असे स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले.

आधी 9 मतांनी पराभव, आता 92 मतांनी विजय

स्वरूपानंद देशमुख यांचा गेल्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून अवघ्या 9 मतांनी पराभूत व्हावे लागले होते, परंतु आता या निवडणुकीत 92 मतांनी त्यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत स्वरूपानंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी गावातील काही गटांनी केली होती. मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी अखेरपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. परिणामी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि यात अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana