Dailyhunt
स्वयंपाक सुरू असताना गॅस सिलिंडरचा स्फोट, सात जण होरपळले

स्वयंपाक सुरू असताना गॅस सिलिंडरचा स्फोट, सात जण होरपळले

सामना 1 week ago

स्वयंपाक सुरू असताना गॅसची गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील सात जण होरपळले. राजस्थानातील भिवाडी येथील सातलक गावात ही हृदयद्रावक घटना घडली. जखमींना तात्काळ उपचारासाठी भिवाडी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, स्वयंपाक सुरू असताना गॅस गळतीमुळे सिलेंडरला आग लागली आणि घरात स्फोट झाला. घटनेवेळी घरात सात जण उपस्थित होते. हे सर्वजण या स्फोटात होरपळले. घरातील सदस्यांच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावत आले.

स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांना माहिती दिली. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अलवार येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच भिवाडी फेज 3 पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पुढील तपास सुरू केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana