Thursday, 24 Jun, 11.00 am सामना

ठळक
स्वयंपाकी पुरुषांचे गाव! पुद्दुचेरीच्या कलायूर गावात अनोखी परंपरा

स्वयंपाकघर म्हटलं की तिथं फक्त महिलांचा वावर असतो असं समजलं जातं. बहुतेक पुरुषही स्वयंपाकघरात काम करताना दिसतात. पण महिलांसारखं पूर्ण दिवस स्वयंपाकघर अजूनही सांभाळत नाहीत. पण पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशातील कलायूर गाव मात्र वेगळंच आहे. गावात 500 वर्षांपासून घरातील स्वयंपाकघर पुरुष सांभाळत आहेत. त्यामुळेच त्याला स्वयंपाकी पुरुषांचं गाव असं म्हटलं जातं.

कलायूर गावचे पुरुष आधीच्या काळात शेतीची कामं करायचे. त्या काळात नोवऱयाही फारशा नव्हत्या. त्यानंतर पुरुषांनी स्वयंपाकी होण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच ते व्यवसायही करतात.

पुद्दुचेरीपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात 80 घरे आहेत. या प्रत्येक घरात एक उत्तम शेफ आहे. त्यांच्या हाताला उत्तम चव आहे. त्यांच्या हातचे पदार्थ खाऊन सारेच तृप्त होतात. गावातील मुख्य शेफ त्यांना जवळजवळ 10 वर्षे स्वयंपाक कसा करायचा याचं ट्रेनिंग देतोय.

दक्षिणेकडील सगळ्या रेसिपींचे ट्रेनिंग हा शेफ आपल्या गावातल्या स्वयंपाकींना देतो. या गावात साधारण 200 तरी स्वयंपाकी आहेत. आजूबाजूच्या परिसरातील लग्न, पाटर्य़ा आदी समारंभात तेच जेवण बनवतात. त्यासाठी त्यांना अनेक गावांतून ऑर्डर येतात. एकप्रकारे कुकिंग हा त्यांचा व्यवसाय झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top