Sunday, 19 Jan, 6.00 pm सामना

ठळक बातम्या
तरुण मॉडेललाही लाजवेल असा आहे 'या' 60 वर्षीय मॉडेलचा अंदाज

दिनेश मोहन हे हिंदुस्थानातील मोठ्या वयाचे मॉडेल आहेत. ते 60 वर्षांचे असले तरी त्यांचा अंदाज हा तरुण मॉडेलला देखील लाजवेल असा आहे.

जिम करून मिळवलेली रेखीव बॉडी, ड्रेसिंगचा जबरदस्त सेन्स, पांढरे केस व दाढीमुळे येणारा हटके लूक ही दिनेश मोहन हे त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा चार चाँद लावतात.

दिनेश मोहन हे मूळचे हरयाणाचे असून ते पूर्वी हरयाणाच्या सरकारी कार्यालयात कामाला होते. त्यांच्या खासगी आयुष्यात आलेल्या एका वादळाने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. त्यांना नोकरी सोडावी लागली व ते नैराश्यात गेले.

2014 पर्यंत दिनेश यांना कुणीही ओळखत नव्हतं. त्यांचे वजनही 130 किलो होते. ते त्यांच्या पायावर उभेही राहू शकत नव्हते. मात्र त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याने त्यांना प्रेरणा दिली. त्यानंतर त्यांनी डाएट करणं व जिमला जायला सुरुवात केली. सहा महिन्यातच त्यांनी त्यांचे वजन 52 किलो वजन कमी केले.

दिनेश मोहन यांनी आतापर्यंत 600 हून अधिक वेळा मॉडेलिंगसाठी शूट केले असून अनेक नामांकित डिझायनरसाठी त्यांनी रॅम्प वॉक केले आहे.

दिनेश यांनी सलमान खान व कतरिना कैफ यांच्यासोबत भारत चित्रपटातही काम केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana
Top