Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टायगर श्रॉफच्या सुरक्षेत वाढ; गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून बॉडीगार्ड तैनात

टायगर श्रॉफच्या सुरक्षेत वाढ; गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून बॉडीगार्ड तैनात

सामना 3 days ago

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून टायगरच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड तैनात करण्यात आले असून, स्थानिक पोलिसांनीही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली आहे.

या गोळीबार प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

गोळीबाराच्या घटनेपूर्वी टायगर श्रॉफसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे तो हल्लेखोरांच्या सहज निशाण्यावर आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुरक्षा विभागाने अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड तैनात केले आहेत. तसेच स्थानिक पोलीस ठाण्याकडून एका पोलीस अधिकाऱ्यासह अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, टायगरला कोणत्या श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असण्याची शक्यता तपासली जात आहे. अभिनेत्याच्या मनात भीती निर्माण करणे आणि त्याच्याकडून खंडणी वसूल करणे, हा हल्ल्यामागील संभाव्य उद्देश असू शकतो, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी सोमवारी सकाळी राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावरून तीन संशयितांना अटक केली. मुंबईहून नेपाळच्या दिशेने जात असताना पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील बेगुसराय येथील ऋतिक ऊर्फ रोशन आणि हरियाणातील सोनीपत येथील रेहान यांचा समावेश आहे. तिसऱ्या संशयिताची सविस्तर ओळख या वृत्तात देण्यात आलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana