Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
टेकड्या खोदल्या; सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला, मातीमाफियांनी मुरबाडला पोखरलेली, तहसीलदारांनी कारवाई करूनही धाक नाही

टेकड्या खोदल्या; सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला, मातीमाफियांनी मुरबाडला पोखरलेली, तहसीलदारांनी कारवाई करूनही धाक नाही

सामना 2 weeks ago

मातीमाफियांनी मुरबाडला अक्षरशः पोखरले असून सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला आहे. तालुक्यातील उदाळडोह, हायवेपासून माळशेज घाट ते मोरोशी, सावर्णे, मेर्दी या भागातील टेकड्या खोदल्या आहेत.

त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तहसीलदार अभिजित देशमुख यांनी मातीमाफियांवर कारवाई करून आतापर्यंत २ कोटी ६६ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पण ही कारवाई केल्यानंतरही मुरबाडला पोखरण्याचा गोरखधंदा सुरूच न आहे. दरम्यान माती चोरांना जेरबंद न करण्यासाठी तहसीलदारांनी विशेष ई पथके नेमली असून कुणाचीही गय करणार नाही, असा इशाराच देशमुख यांनी दिला आहे.

मुरबाड तालुक्यात अनेक धनदांडग्यांचे बंगले असून डोंगर, टेकड्यादेखील सोडलेल्या नाहीत. या टेकड्या साफ करून त्याचे न प्लॉट तयार केले जातात. हे प्लॉट लाखो रुपयांना विकण्यात येत आहेत. पावसाळा सुरू झाला तरीदेखील घाट परिसरातील खोदकाम अजूनही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी तहसीलदारांनी मातीचे पाच डंपर व दोन पोकलेन मशीन पकडल्या होत्या. त्यावर कारवाई करून ७ लाख ५३ हजार रुपयांचा दंड आकारला होता. या कारवाईनंतरही टेकड्यांवर डोंगर पोखरण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. दिवसाढवळ्या माफिया व महसूल विभागाच्या संगनमताने गौण खनिजाची चोरी होत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख सतीश घरत यांनी केला आहे.

भूस्खलनाचा धोका

मुरबाड-माळशेज हायवेवरील वरस, न्याहाडी, मोरोशी, सावर्णे, तळेगाव, भीमाशंकर, अभयारण्य पट्ट्यातील हजारो ब्रास मातीचे उत्खनन आतापर्यंत करण्यात आले आहे. ही माती घाटमाथ्यावर नेऊन ती बांधकामासाठी वापरली जाते. टेकड्या भुईसपाट केल्यामुळे पावसाळ्यात भूस्खलन होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.

नॅशनल हायवेचे काम सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन आले आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. मातीचोरीवर उपाय म्हणून विशेष पथक नेमले असून कुणाचीही गय केली जाणार नाही.

अभिजित देशमुख (तहसीलदार)

माळशेज हायवेलगत स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकामध्ये तलाठी, सर्कल यांचीदेखील नियुक्ती केली असून रात्री हे पथक गस्त घाल ण्याचे काम करत आहे.

सुषमा बांगर (नायब तहसीलदार)

सावर्णे गणपती बोगदा, टोकावडे, उमरोली, सरळगाव, मुरबाड, पोटगाव, शहाडचा पूल या ठिकाणी महसूल विभागाच्या चौक्या आहेत. तरीदेखील तेथील अधिकाऱ्यांना मातीचा डंपर दिसला नाही काय, असा सवाल भूमिपुत्रांनी केला आहे.

वाळूमाफियांनी काळू नदीत बेसुमार वाळूचा उपसा यापूर्वीच करून ठेवला आहे. आता मुरबाडमधील माफियांचा डोळा मुरबाडमधील डोंगर, टेकड्या या ठिकाणी गेला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana