Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
थोर पुरुषांची नावे असलेल्या चौकांत माहिती फलक उभारा! शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी

थोर पुरुषांची नावे असलेल्या चौकांत माहिती फलक उभारा! शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी

सामना 2 weeks ago

मुंबईतील थोर पुरुषांची नावे असलेल्या रस्ते व चौकांवर त्यांच्या कार्याची माहिती देणारे माहिती फलक उभारण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

महापुरुषांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे तसेच त्यांच्या स्मृती केवळ रस्त्यांच्या नावापुरत्या मर्यादित न राहता कायम जिवंत राहाव्यात, या उद्देशाने पालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, असेही पत्रात नमूद केले आहे.

मुंबईतील अनेक रस्ते आणि चौकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून महाराष्ट्र तसेच देशातील थोर पुरुषांची नावे देण्यात आली आहेत. मात्र, काळाच्या ओघात फारशी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे अनेक महापुरुषांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे ते विस्मृतीत जात असल्याची खंत शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, महापुरुषांची नावे असलेल्या संबंधित रस्ते किंवा चौकांवर आकर्षक आणि साचेबद्ध स्वरूपातील माहिती फलक उभारून त्या महापुरुषांचे कार्य, योगदान आणि इतिहास नागरिकांसमोर मांडावा, अशी मागणी खासदार अनिल देसाई यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हा उपक्रम ‘सीएसआर’ (CSR) निधीतून राबविल्यास महापालिकेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana